पुन्हा लॉकडॉऊनचे संकेत?

महाराष्ट्रात या 8 कारणांमुळे
पुन्हा लॉकडॉऊनचे संकेत?

📂 : सोर्स BBC

❇️माझा श्रीगोंदा©
💬डायरेक्ट टू इनबॉक्स👇
🌍https://Shrigonda.in

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जनतेला अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडॉऊन लागू होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.
लॉकडॉऊनसंदर्भात पुढील काही दिवसांत आढावा घेऊ, असं अजित पवार म्हणाले आहेत.

‘कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी ठरेल की काय अशी भीती वाटते’, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी ते उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करतील.

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे तर अहमदाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रात्रीची संचारबंदी करावी लागली. सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्रातही पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

🧐सलग पाच दिवस रुग्णसंख्येत वाढ

महाराष्ट्रात सलग पाच दिवस पाच हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारी (22 नोव्हेंबर) नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी जवळपास 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतून आहेत.

17 नोव्हेंबरपर्यंत सहा ते सात दिवस महाराष्ट्रात 5 हजारहून कमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती.

साधारण 3 ते 4 हजार नवीन रुग्णांची नोंद होत होती. पण गेल्या पाच दिवसांपासून ही संख्या पाच ते सहा हजारांवर पोहोचली आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात 17 लाख 80 हजार 208 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

याविषयी बोलताना राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, “दिवाळीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी दिसली कारण सणासुदीच्याकाळात टेस्टींग कमी झालं होतं. यामुळे केसेसही कमी दिसल्या. आता कोरोना चाचणी करण्याचं प्रमाण पूर्ववत झालं आहे. दरदिवशी साधारण 80 ते 90 हजार कोरोना चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत.”

🔐महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडॉऊनची शक्यता?

दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास पाच ते सहा हजार नवीन रुग्ण आढळत आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत दर 24 तासांत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक होती. पण आता नवीन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लॉकडॉऊनसंदर्भातील प्रश्न विचारला असता त्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. तसंच पाच ते सहा दिवसांत राज्य सरकार आढवा घेईल अशी माहिती त्यांनी दिली.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडॉऊनसंदर्भात स्पष्ट बोलले नसले तरी दिल्ली, गुजरातनंतर महाराष्ट्रातही दुसरी लाट येऊ शकते, त्यामुळे सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोनाची लागण आता तरुणांमध्येही होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत असून ही काळजीची बाब आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातल्या जनतेला दोन वेळा लस देण्याचा विचार केला तरी 24-25 कोटी लोकांना लस द्यावी लागेल.
अद्याप लस आपल्याकडे आलेली नाही. तेव्हा लस येण्यासाठी अजूनही वेळ लागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात काही गोष्टींवर पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

⚽’पुढच्यास ठेस मागचा शहाणा’

गुजरातनंतर दिल्लीत आता पुन्हा एकदा लॉकडॉऊन लागू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वेळ महाराष्ट्रावर येऊ नये यासाठी लोकांमध्ये नव्याने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दिवाळीच्या काळात लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यावेळी लोकांमधील सतर्कता कमी झाल्याचं दिसून आलं. मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे या सवयींचा लोकांना विसर पडताना दिसला.

डॉ. प्रदीप आवटे सांगतात, “लॉकडॉऊनसंदर्भात आपण केवळ शक्यता व्यक्त करत आहोत. कारण दिल्लीमध्ये गंभीर परिस्थिती असल्याने आपण अधिक काळजी घेत आहोत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

“लॉकडॉऊनचा निर्णय सर्वांगीण अर्थाने घ्यावा लागणारा निर्णय आहे. युरोपमध्ये पुन्हा लॉकडॉऊन केलं गेलं. दिल्लीत जे घडत आहे ते महाराष्ट्रातही घडू शकतं याचा अंदाज आपल्याला आहे. म्हणूनच सतर्कतेचा इशारा दिला जात आहे,” असंही डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.

🤩लॉकडॉऊन हा कायस्वरूपी पर्याय आहे का?

राज्यासह देशात सलग पाच ते सहा महिने लॉकडॉऊन लागू होते. याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडला.

राज्याची आर्थिक परिस्थितीही फारशी वेगळी नाही. अर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेले असताना पुन्हा एकदा सर्वकाही ठप्प केल्यास सामान्य जनतेला त्याचा भार सोसावा लागणार हे स्पष्ट आहे. यामुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याचीही काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.

डॉक्टरांनुसार, रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लॉकडॉऊन लागू करणे आता परवडणारे नाही. यामुळे त्रिसुत्री नियमच पाळणं सध्या अत्यावश्यक आहे.

फोर्टीस हॉस्पिटलचे क्लिनिकल संचालक डॉ. राहुल पंडीत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, “कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा लॉकडॉऊन लागू होण्याची भीती नक्कीच आहे.

लॉकडॉऊनमध्ये लोकांचे एकमेकांना भेटणे कमी झाले आणि गर्दी कमी झाली की कोरोनाचा संसर्ग कमी होईल हे खरं आहे. पण लॉकडॉऊन हा उपाय आहे का,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे हे सुद्धा या मताशी सहमत आहेत. पुन्हा एकदा सर्वकाही बंद करणे हा कायमस्वरुपी उपाय नाही असं त्यांनाही वाटतं.

ते सांगतात, “लॉकडॉऊनचे दुष्परिणाम आजारा इतकेच भयंकर आहेत. लोकांचे दैनंदिन प्रश्न आहेत. लॉकडॉऊन हे या प्रश्नाचं कायमस्वरूपी उत्तर नाही. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू केलं असताना प्रतिबंधात्मक काळजी घेणं आवश्यक आहे.”

🥶हिवाळा असल्याने अधिक काळजी

महाराष्ट्रात ‘मिशन बिगेन’अंतर्गत जवळपास सर्वच बाबी काही नियमांअंतर्गत खुल्या केल्या आहेत. दिवाळीचा सणही अनलॉकच्या याच टप्प्यात आला. त्यामुळे सलग सहा ते सात महिने घरी बसलेले लोक मोठ्या संख्यने बाहेर पडले. त्यात हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात साथीचे आजार अधिक बळकट होण्याची शक्यता असते.

मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये आपण थंडीच्या दिवसात धुरक्याची चादर पसरल्याचं पाहतो. हे धुरकं म्हणजे वातावरणातील प्रदूषण. विषारी वायू, धुलीकण आणि श्वसनास अडथळा निर्माण करणारे घटक असलेली हवा आपण आत (Inhale) घेतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

हे देखील हिवाळ्यात ‘फ्लू’ चा संसर्ग झपाट्याने पसरण्याचं कारण आहे.

आता हिवाळा येत असल्याने फफ्फुसांचे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे खबरदारी महत्त्वाची असल्याचं, तज्ज्ञ सांगतात.

🧐’या’ कारणांमुळे महाराष्ट्रात संसर्ग वाढला

राज्यात कोरोनाची संख्या सातत्याने वाढण्याचं काय कारण आहे, याबाबत आम्ही डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांना विचारलं. त्यांनी खालील कारणं सांगितली.

1⃣अनलॉक –
अनलॉकमुळे दुकानं, हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठा खुल्या झाल्या. त्यामुळे प्रवास वाढला, दुकानांमध्ये ग्राहक जाऊ लागले, खरेदी होऊ लागली.

2⃣ दिवाळी –
दिवाळी निमित्ताने लोक पूर्वीपेक्षा अधिक काळ लोकांच्या संपर्कात आले.

3⃣रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचणीत दिरंगाई – सुरुवातीच्या काळात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला की त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती प्रशासन घेत होते. त्यांना क्वारंटाईन करून त्यांची कोरोना टेस्ट केली जात होती. पण आता या कामात खंड पडताना दिसत आहे.

4⃣ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी –
डॉक्टर्स सांगतात, एखादा लक्षण नसलेला रुग्ण आमच्याकडे आला तर आम्ही त्याला संबंधित कोरोना हॉस्पिटलमध्ये पाठवतो. अशा अनेकांना हॉस्पिटलकडून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात येतो. पण त्या रुग्णाचे पुढे काय होतं? त्याने क्वारंटाईन पूर्ण केलं का? कुठे प्रवास केला का? त्याची टेस्ट निगेटिव्ह आली का? याकडे प्रशासन आता लक्ष देत नाही आणि आम्हालाही कळवत नाही.

5⃣ मास्क न वापरणे –
महाराष्ट्रात मास्क वापरला नाही तर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही नागरिक मास्क लावत नसल्याचं निदर्शनास येत आहे.

6⃣ सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करणे – पावसाळा असल्याने आणि हवामानात सतत बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यापैकी अनेकांना कोरोनाचीही लागण झालेली असते. पण अनेकजण असे आजार अंगावर काढतात. ते दवाखान्यात जाईपर्यंत त्यांच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झालेली असते.

7⃣ आरटी पीसीआर टेस्ट न करणे – अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा कोरोनाची आरटी पीसीआर ही टेस्ट करणं अपेक्षित आहे. पण तसं होताना दिसत नाही.

8⃣सॅनिटायझेशन न होणे – एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण आढळला की त्या भागाचे सॅनिटायझेशन होणे गरजेचे आहे. पण याचं प्रमाणही आता कमी झाले आहे.

📂 : सोर्स BBC

❇️माझा श्रीगोंदा©
💬डायरेक्ट टू इनबॉक्स👇
🌍https://Shrigonda.in

Leave a Reply