१० फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी

♦️दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी

माझा श्रीगोंदा®

श्रीगोंदे तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदांच्या २३ ग्रामपंचायतींच्या निवडी बुधवार दिनांक १० फेब्रुवारी२०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत घेतल्या जाणार आहेत.

♦️दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या निवडी
१)मुंगुसगाव २)चांभुर्डी ३) वेळू ४) कोरेगव्हाण ५) सुरोडी ६) हिरडगाव ७) पिंपरी कोलंदर ८) पिसोरेखांड ९) घोटवी १०) चांडगाव ११) खांडगाव -वडघुल १२) बाबुर्डी १३) चिखली १४) यवती १५) कोथुळ १६) घोडेगाव १७) म्हातार पिंपरी १८) रायगव्हाण १९) उकडगाव २०) वडाळी २१) बेलवंडी कोठार २२) कोरेगाव २३) सुरेगाव

सुरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी होती. परंतु गणपूर्ती न झाल्याने निवडणूक तहकूब करण्यात आलेली आहे. दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या वेळेत पार पडेल.

९फेब्रुवारी२०२१ रोजी झालेल्या निवडणुकीचे किस्से

१) आर्वी- अनगरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) असल्याने व त्या प्रवर्गातील महिला उपलब्ध नसल्याने सरपंच पदाची निवड होऊ शकली नाही.

२) सुरेगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात असून गणपूर्तीसाठी चार सदस्य हजर असणे गरजेचे होते. तथापि दोनच सदस्य हजर राहिले. त्यामुळे दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजीची निवडणूक तहकूब करण्यात आली. ती आज दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या वेळेत होणार आहे. आज होणाऱ्या निवडणुकीसाठी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.

३) भानगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच- उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये एका सदस्याने गुप्त मतदानाच्या प्रक्रियेत उमेदवारा बरोबर मतपत्रिकेत नोटा च्या (NOTA) रकान्याचा आग्रह धरल्याने सदर निवडणूक एक ते दीड तास खोळंबली.


मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम १० मध्ये निवडणुकीची कार्यपद्धती दिलेली आहे. निवडणूकीचे मतदान हात वर करून घेण्याची तरतूद आहे. अशावेळी काही सदस्य तटस्थ राहू शकतात. म्हणजे हात वर करीत नाहीत.
एखाद्या सदस्याने गुप्त मतदानाची मागणी केल्यास मतपत्रिका तयार करून गुप्त मतदान घ्यावे लागते. या मत पत्रिकेत नोटाचा रकाना ठेवण्याची तरतूद नाही. ज्या सदस्यांचा नोटाचा आग्रह असेल त्यांनी मतदान न करता तटस्थ राहून नोटाची भूमिका बजवावयाची असते.
अखेर भानगाव ग्रामपंचायत मधली हा तिढा सुटला आणि निवडणूक पार पडली.

४) दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या सरपंच- उपसरपंच पदांच्या निवडणुकीत घोडेगाव आणि वडाळी येथे आरक्षित जागेचा सदस्य उपलब्ध नसल्याने या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूका तहकुब होतील. फक्त उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडतील.

प्रा. तुकाराम दरेकर
—–०००——–

Leave a Reply