नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप यादीवरील ६६ हरकतींची २५ फेब्रुवारीला सुनावणी.

माझा श्रीगोंदा®

दिनांक २३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

🏭सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या दिनांक २७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर ७१० व्यक्तींनी ६६ हरकती दाखल केलेल्या आहेत.

🏭या हरकतींची सुनावणी दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कार्यालयात घेतली जाणार आहे.

🏭नागवडे सहकारी साखर कारखान्याने जानेवारी २०२० मध्ये ९ हजार ५८९ व्यक्तिगत सभासदांची आणि १० संस्था सभासदांची प्रारूप यादी पात्र ठरवून, प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांचेकडे पाठवलेली होती. ही यादी प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांनी दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध करून त्यावर दि. २७ जानेवारी २०२० पर्यंत हरकती व आक्षेप मागविले होते.

🏭कोविडमुळे मागीली वर्षभर निवडणूक प्रक्रिया सुनावणीच्या टप्प्यावर थांबलेली होती.
नागवडे साखर कारखान्याच्या ३३ सभासद संस्थांनी प्रारूप यादीवर ८ हरकती नोंदविलेल्या आहेत. तर ६७० व्यक्तिगत सभासदांनी ५८ हरकती नोंदविलेल्या आहेत.

🏭एकूण ६६ हरकतींची सुनावणी गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्या कार्यालयात होणार असून, तशा नोटीसा साखर कारखान्यामार्फत बजावण्याचे काम चालू आहे.

Leave a Reply