कॉफी आणि कप

एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटले.

   ते सर्वजण आपापल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत होते आणि भरपूर पैसेही कमावत होते.

 एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवले.

  प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर, प्रोफेसरानी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारले.

   हळुहळू गप्पा रंगल्या आणि प्रत्येकांने जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करून बरेच काही सांगितले.

    शेवटी सर्वजण एका मुद्दयाशी सहमत झाले की,जरी आपण आर्थिक स्थितीने कितीही मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.

     प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होते...

    आणि मग ते अचानक किचनमध्ये गेले आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणाले की,

    मी तुम्हा सर्वांसाठी कीटली मधे कॉफी आणली आहे तुम्ही किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी एक एक रिकामा कप घेऊन या...

  सर्वजण किचनमध्ये गेले. तिथे अनेक प्रकारचे कप होते.

   आपल्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने कप घेतले.

  प्रत्येकाने निवडलेले कप पाहून प्रोफेसर त्यांना म्हणाले की,

   "तुम्ही सर्वांनी कप निवडताना जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे म्हणून निवडला असे दिसत आहे.... जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षही दिले नाही...

    साहजिकच आपण जेव्हा एकीकडे स्वतःसाठी उच्च दर्जाच्या वस्तू बाबत इच्छा मनात ठेवतो, तेव्हा दुसरीकडे हीच इच्छा बर्याचवेळी आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असतात.

    वास्तविक पाहता हे तर निश्चित आहे की, कप कोणताही घेतला असता तरी कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाव्हता. कप तर केवळ एक माध्यम आहे की, ज्याच्या मधुन तुम्ही कॉफी पिणार आहात.

   तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती, कपाची निवडण्याची नाही.

   तरीही सर्वांनी महागातले महागच कप निवडले. आणि आपला कप निवडल्या नंतरही तुम्ही दुसऱ्‍यांच्या कपाकडेच बघत आहात.

   सर्वांनी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती , ती एकच राहिली असती! हेच सर्वात महत्त्वाचे.

 तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.... आपली नोकरी, पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.

  म्हणून चांगल्या कॉफीची चिंता करा... भारी कपाची नाही.

    जगात सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं......
    तर......

सुखी ते असतात जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात व जे त्यांच्याकडे आहे त्यामध्ये आनंदी रहातात…!

   म्हणून साधेपणाने जगा. सर्वांशी प्रेमाने वागा. सर्वांची काळजी घ्या. सर्वांशी नेहमी संपर्कात रहा व शक्य असल्यास प्रत्यक्ष भेटा..!!!
Enjoy your Coffee

Leave a Reply