युद्धाचे नगारे, आक्रमणाच्या घोषणा

•एका राजाचे
•त्याच्या हत्तीवर खूप प्रेम होते…

•तो हत्ती ही खूप चांगलाच स्वामीभक्त होता तसेच चांगला योद्धाही होता.

•त्या हत्तीवर बसून राजाने जेव्हाही युद्ध केले
राजा विजयीच झाला.

•काही वर्षात हत्ती म्हतारा व्हायला लागला. आता राजानेही आता त्याला युद्धात घेवून जाणे बंदच केले.

•एक दिवस हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत असतांना अचानक त्याचा तोल गेला आणि तो सरोवराच्या चिखलात फसला आता त्याला उभेच होता येत नव्हते.

•हत्ती ने खूप प्रयत्न केले पण त्याच्या वृद्धावस्थेमुळे त्याला चिखलातून निघणे शक्य नव्हते..

•आता तो जोरजोरात ओरडू लागला. हत्तीचा आवाज माहूताने ऐकल्यावर तो धावतच हत्तीच्या जवळ आला.

•परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. 

•सर्वांना वाटलं, भाल्याच्या टोचण्याने तो आपली पूर्ण शक्ती लावून प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.

•भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ही बातमी राजापर्यंत गेली. 

•राजाने लगेच त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.

•थोडा वेळ विचार करून माहूतने राजाला सल्ला दिला की….

•महाराज…❗
•आपण आत्ता युद्धाचे नगारे वाजवा,
•या सरोवराभोवती सैन्य जमा करा,
•सैनिकांना आक्रमणाच्या घोषणा द्यायला सांगा. 

•राजाने त्या जुन्या महुताचे विचार ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा आदेश दिला. 

•राजाचे आदेश मिळताच नगारे वाजू लागले,
•सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, 
•आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. 

•त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या चिखलातून बाहेर पडला.

•हत्तीचं मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

•लक्षात ठेवा
•निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.
•सकारात्मक विचारसरणीने प्रगती होते.
••• ••• •••

•जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते ..

•आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते…!
••• ••• •••

••वाजूद्या नगारे❗
••द्या आक्रमणाच्या घोषणा❗
••संचारुद्या तुमच्यातील वीरश्री❗
••हरहर महादेव❗
••सुप्रभात❗

INSTAGRAM

Leave a Reply