अनलॉकच्या प्रत्येक टप्यातील नियम

*कोरोना लॉकडाऊन :*
*पाच स्तरात अनलॉक होणार महाराष्ट्र,*

*तुमचा जिल्हा कुठल्या स्तरात?*

*प्रत्येक टप्प्यामध्ये कोणते नियम आहेत*

🔐महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘अनलॉक’ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलली आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’साठी सरकारने नियमावली जाहीर केलीय.

🔐जनजीवन सुरळीत करतानाच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान महाराष्ट्र सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारनं पाच स्तरात (Levels) जिल्ह्यांची विभागणी केलीय आणि या स्तरांनिहाय नियम बनवले आहेत.

🔐हे पाच स्तर काय आहेत, ते बनवण्यासाठी काय नियम वापरलेत आणि कुठल्यात स्तरात राज्यातील कुठेल जिल्हे येतात, या सर्व गोष्टी आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया.

▪️राज्य सरकारने कोरोना पॅाझिटिव्हिटी दरानुसार पाच स्तर तयार केले आहेत –

*1⃣पहिला स्तर –*
पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील.

*2⃣दुसरा स्तर –*
पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांपर्यंत भरलेले असतील.

*3⃣तिसरा स्तर –*
पॅाझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.

*4⃣चौथा स्तर –*
पॅाझिटिव्हिटी दर 10-20 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.

*5⃣पाचवा स्तर –*
पॅाझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असतील आणि ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.

*आता आपण पाहू की, या स्तरानुसार काय नियम आहेत. मग शेवटी कुठल्या स्तरात कुठला जिल्हा येतो, ते पाहू.*

*🔲पहिल्या स्तरासाठी हे नियम :*

▪️सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.

▪️मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी नियमतपणे सुरू राहतील

▪️रेस्टॉरंट नियमितपणे उघडतील

▪️लोकल ट्रेन पूर्ववत सुरू होतील. मात्र, स्थानिक DMA याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेईल.

▪️सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल

▪️सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.

▪️सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.

▪️विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल

▪️लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.

▪️बांधकाम, कृषी, ई-कॉमर्स नियमित सुरू राहतील

▪️आंतरजिल्हा प्रवास नियमित. मात्र, लेव्हल-5 जिल्ह्यातून कुणी येत असेल तर ई-पास बंधनकारक असेल.

▪️जमावबंदी लागू राहणार नाही.

*🔲दुसऱ्या स्तरासाठी हे नियम :*

▪️सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.

▪️मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी 50 टक्के क्षमतेत सुरू होतील

▪️लोकल ट्रेन वैद्यकीय सेवा, अत्यवश्यक सेवा, महिलांसाठी सुरू राहतील. DMA आवश्यकतेनुसार निर्णय घेतील.

▪️सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल

▪️सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.

▪️सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.

▪️विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी मर्यादा इनडोअर गेम्सना आहे. तर आऊटडोउर गेम्स पूर्ण दिवस बंद राहतील.

▪️चित्रिकरण नियमितपणे सुरू राहील.

▪️सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.

▪️लग्न समारंभांसाठी हॉलच्या 50 क्षमतेइतकी उपस्थितीची मुभा. मात्र, जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी.

▪️अंत्यविधीसाठी उपस्थितीची कुठलीही मर्यादा नाही.

▪️सभा आणि निवडणुकांसाठी 50 टक्क्यांच्या उपस्थितीच मर्यादा असेल.

▪️बांधकाम, कृषी, ई-कॉमर्स हे नियमित सुरू राहतील.

▪️सार्वजनिक वाहनं 100 टक्के क्षमतेने चालतील.

▪️जमावबंदी लागू राहील.

*🔲तिसऱ्या स्तरासाठी हे नियम :*

▪️अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

▪️अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहतील.

▪️मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील.

▪️रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेनं उघडीतल. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील.

▪️लोकल ट्रेन केवळ वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी सुरु राहील. DMA आवश्यकेतनुसार निर्णय घेतील.

▪️सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत रोज सुरु राहतील.

▪️खासगी कार्यालयं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू ठेवता येतील.

▪️सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीत, खासगी कार्यलायांनाही हीच अट लागू.

▪️विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9, संध्याकाळी 6 ते रात्री 9 ही वेळ असेल.

▪️चित्रिकरणासाठी बयो-बबल बंधनकारक. संध्याकाळी 5 नंतर परवानगी नाही.

▪️सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.

▪️लग्न समारंभात 50 लोक जण उपस्थित राहू शकतात.

▪️अंत्यविधीला 20 लोक उपस्थित राहू शकतात.

▪️सभा आणि निवडणुकांना 50 टक्क्यांची मर्यादा.

▪️बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांद्वारे काम सुरू ठेवता येईल. मात्र दुपारी 4 नंतर बंद करावं लागेल.

▪️ई-कॉमर्स नियमित सुरू राहील.

▪️कृषी क्षेत्राचं काम रोज संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहील.

▪️सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेनं सुरू राहील.

▪️जमावबंदी संध्याकाळी 5 पर्यंत, तर संचारबंधी संध्याकी 5 नंतर लागू असेल.

*🔲चौथ्या स्तरासाठी हे नियम :*

▪️अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील

▪️अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील

▪️सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील

▪️हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील

▪️सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)

▪️अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील

▪️शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती

▪️विविध खेळ (आऊटडोअर) सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील

▪️कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही

▪️लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक

▪️राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील

▪️ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील

▪️कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.

▪️ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील

▪️सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही

▪️सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही

▪️संचारबंदीचे नियम लागू राहतील

▪️पाचव्या स्तरात अद्याप एकही जिल्हा नाहीय.

*🧐कोणता जिल्हा कोणत्या स्तरात येतो?*

*आता आपण कोणता जिल्हा कोणत्या स्तरात येतो, ते पाहू. या जिल्ह्यांना स्तरनिहाय वेगवेगळे नियम लागू होतील.*

*1⃣पहिला स्तर –*

अहमदनगर
चंद्रपूर
धुळे
गोंदिया
जळगाव
जालना
लातूर
नागपूर
नांदेड
यवतमाळ

*2⃣दुसरा स्तर –*

हिंगोली
नंदुरबार

*3⃣तिसरा स्तर –*

मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
अकोला
अमरावती
बीड
भंडारा
गडचिरोली
उस्मानाबाद
पालघर
परभणी
सोलापूर
वर्धा
वाशिम

*4⃣चौथा स्तर –*

पुणे
बुलडाणा
कोल्हापूर
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग

*1⃣2⃣3⃣4⃣5⃣*
*अहमदनगर डॉट कॉम*

Leave a Reply